कोरोना सुरक्षितेचे नियम पाळत झाले “शुभमंगल सावधान”

देगलूर/आजीम आनसारी : सुरक्षित अंतर आणि मोजक्या घरच्या लोकांच्या उपस्थितीत शुभमंगल असा लग्नाचा सोहळा साजरा करण्यात आला.
लग्न म्हणजे मोठा डामाडोल वराती, पंगती, मंगल कार्यालय डीजे, वाजंत्री असा अनेक हौस आणि खर्चाचा सोहळा काही महिन्यांपर्यंत आपण पाहत होतो. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जगाच्या पाठीवर अनेक बदल झालेले दिसत असतांना आता लग्न सोहळेही अतिशय साध्या पद्धतीने होत आहेत. असे लग्न करणारे कुटुंब हे साध्या पद्धतीने विवाह सोहळे साजरे करुन समाजापुढे निश्चित एक वेगळे आदर्श निर्माण करीत आहेत.
असाच एक लग्न सोहळा देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे अतिशय साध्या पद्धतीने पार पडून तो कौतुकाचा विषय ठरला आहे. कुशावाडी येथील पत्रकार मिलिंद वाघमारे यांचा लग्न पंचशील विठ्ठल कांबळे यांची कन्या कोमल कांबळे रा. लोणी येथील यांच्याशी विवाह ठरला. यात विवाहा निश्चित असताना गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने या दोन्ही कुटुंबात समन्वय होऊन लग्न सोहळा मोजक्या घरातील लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले गेले आणि रविवारी लग्न सोहळा पार पाडण्यात आला हा सोहळा घरातच मोजक्याच लोकांच्या उपस्थितांना संपन्न झाला.
या लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या पत्रकार बंधुंना व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या रक्षण करणाऱ्या रक्षकांना मास्क आणि सनीटाइजर वाटून अगदी शिस्तबद्ध आणि सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून झाल्याने समाजात एक आदर्श निर्माण झाला आला आहे.
या विवाह सोहळ्याला देगलूर नगरीचे नगराध्यक्ष मोगलाजी, गोपाळ नाईक संचालक जनजागृती विद्यालय, नगरसेवक सुशिलकुमार देगलूरकर, अशोक दाचावार व पत्रकार मंडळी आदींच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला

118 Views

Leave a Reply

Your email address will not be published.