सुर्यपूत्र कर्णा प्रमाणे गावकऱ्यांची काळजी घेतात सूर्यभान नाना मुंडे

परळी : येथून सहा किलोमीटरवरील तळेगांवचे सरपंच सूर्यभान नाना मुंडे यांनी कोरोनाच्या संकटात त्यांच्या गावाची डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाना गेल्या पंचवीस वर्षांपासून गावचे सरपंच आहेत.

या लॉकडाऊन काळात त्यांनी गावांतील सर्व नागरिकांना मोफत अन्न धान्य पुरवठा केला आहे. तसेच आगामी वर्षभर संकट लक्षात घेऊन ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत नानांनी गावांत सिमेंट रस्ते, नाल्या, शाळा आदी बांधकाम केले आहे. तसेच गावातील पाणीप्रश्न बिकट असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडेंच्या मार्फत तो प्रश्न सोडवून घेतला. थेट नागपूर तळ्यातून त्यांनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून घेतली. आज गावांत 24 तास पाणी उपलब्ध आहे.

आजच्या कलियुगात सख्खे भाऊ एकमेकांना संकटात साथ देत नाहीत. मात्र सूर्यभान नाना मुंडे संपूर्ण तळेगांवातील हजारो लोकांसाठी सुर्यपूत्र करण्याचा अवतारच असल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे.

स्व. पंडितअण्णा मुंडेंच्या कार्याचे फलित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही स्व. पंडितअण्णा मुंडेंनी आपुलकीने चालवली. त्यांनी जोपासलेल्या वृक्षाला त्याची गोड फळे आली. त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पददेखील नानांनी यशस्वीपणे भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा कै. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार परळी कृ.उ.बा. ला सन 2017 मध्ये सूर्यभान नाना सभापती असताना मिळाला होता.

397 Views

Leave a Reply

Your email address will not be published.