ना. धनंजय मुंडे यांची वचनपूर्ती पांगरी पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण संपन्न ; वाल्मीक अन्ना कराड यांनी केला होता पाठपुरावा

परळी : परळी तालुक्यात असलेल्या पांगरी गावाला आता नागापूर येथील वाण प्रकल्पातून पाणीपुरवठा होणार आहे.तत्कालीन विरोधीपक्षनेते असताना ना.धनंजय मुंडे यांनी पांगरी गावासाठी 1 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती.आता मंत्री होताच त्यांनी पांगरी करांना दिलेला शब्द पाळला आहे आज या महत्त्व कांक्षी योजनेचे लोकार्पण युवा नेते श्री वाल्मिक कराड यांच्या हस्ते,सरपंच सौ. अक्षता सुशील कराड यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

पांगरी करांसाठी असलेल्या महत्वकांक्षी पाणी योजनेचे उद्घाटन आज करण्यात आले परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला होता तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी या पाणी योजनेसाठी तब्बल एक कोटींचा निधी उपलब्ध करून दिला यासाठी केवळ एक वर्षातच ही योजना पूर्ण करून पांगरी करांना संकल्प पूर्ण झाला आहे.

लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर छोटेखानी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्री वाल्मीक कराड, पांगरीच्या सरपंच सौ.अक्षता सुशील कराड, पंचायत समिती उपसभापती,बालाजी (पिंटू)मुंडे,युवक नेते दत्ता कराड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,व वाल्मीम अण्णा कराड यांचे समस्त पांगरिकरांच्या वतीने सरपंच सौ अक्षता सुशील कराड यांनी आभार मानले आहेत.

140 Views

Leave a Reply

Your email address will not be published.