रमजान व लग्नसराईच्या काळात टेलरिंग व्यवसायाला कोरोनाची बांधा; अनेक हात रिकामे, आर्थिक मदतीची गरज

कुंडलवाडी (प्रतिनिधी)- रमजान व लग्नसराईच्या काळात टेलरिंग व्यवसायाला कोरोनाची बाधा झालेली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे टेलरिंग व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे.हाताला काम नसल्यामुळे या व्यवसायातील कारागिरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.यावर अवलंबून असलेल्या शहर व परिसरातील शेकडो टेलरचे हात रिकामेच राहिले आहे.लग्नसराई संपली असल्याने व त्यात लॉकडाऊनमध्ये वाढ होत असल्याने टेलरींगचे व्यावसाय आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे त्यांना या अडचणीच्या काव्यत आर्थिक मदत देवून त्यांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे.कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून शहरात व परिसरातील सर्वच व्यवसाय ठप्प पडले आहेत.त्यात यंदा साखरपुढा,लग्न समारंभ,रमजान ईद व इतर कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे . त्यामुळे यावर्षी यावर अवलंबून असलेल्या टेलरिंग व्यवसायावर अवकळा पसरली असून हाताला काम नसल्याने दररोज कपडे शिवून उदरनिर्वाह चालवणाऱ्या शहरातील हातावर पोट असणाऱ्या टेलरिंग कारागिरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.काम करायची इच्छा असतानाही शिलाई मशीन बसून असल्याने या लॉकडाऊनमुळे माय जेवू देईना तर बाप भिक मागू देईना अशी परिस्थिती टेलर व्यवसायिकांची व त्यावर असलेल्या कारागिरांची झाली आहे.कुंडलवाडी शहर व ग्रामीण भागात अल्प भांडवलावर कारागिरांचा टेलरिंगचा व्यवसाय सुरू आहे.नऊ ते दहा महिने ग्रामीण भागातील टेलरिंग व्यवसाय जेमतेम चालतो,मात्र मार्च,एप्रील व मे हे तीन महिने साखर पुढे,लग्न समारंभ,रमजान ईद व इतर अनेक कार्यक्रम असल्यामुळे टेलरिंग व्यवसायासाठी भरभराटीचा काळ असल्याने या तीन महिन्यात मोठी आर्थिक उलाढाल  होवून चार पैसे टेलरांच्या हातात पडतात.व त्या पैशातून त्यांचा परिवाराचा वर्षभराचा आर्थिक खर्च चालतो.यात चांगला आपला उदरनिर्वाह  चालवितात.पण या लॉकडाऊनच्या संचारबंदीमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे.परिणामी,मोठ्या प्रमाणात टेलरिंग कारागिरांचे कुटुंब संकटात सापडले आहेत . या संचारबंदीमुळे लॉक – डाऊनच्या टेलरिंग व्यवसायिकांना दुसरा कोणताही व्यवसाय करता येत नाही त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. * ऐन लग्नसराईत व रमजान मध्ये व्यवसाय अडचणीत साधारणतः मार्च , एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये साखरपुढे , लग्न समारंभ , रमजान ईद व इतर अनेक कार्यक्रम असल्यामुळे टेलरिंग व्यवसायासाठी तीन महिने भरभराटीचा काळ असल्याने या तीन महिन्यात टेलर व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात काम मिळते.व चार पैसे हातात पडतात.मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे यंदाची लग्नसराई वाया गेली असून लॉकडॉऊन वाढत असल्याने हाताला काम राहिले नसल्याने टेलरिंग व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . त्यामुळे अडचणीत आलेल्या टेलरांना आर्थिक मदत देवून त्यांना मदतीचा हात द्यावे.अशी मागणी  करणा-यात येत आहे.

102 Views

Leave a Reply

Your email address will not be published.