घरची परिस्थीती घरी बसु देत नाही ; आणि बाहेर काम मिळत नाही करावे तर काय..? बुट पाॅलीस करणार्‍या चंदुची व्याथा

पाथरी/आवडाजी ढवळे : कोरोणाच्या भितीने साहेब म्हणतात घरीच थांबा परंतु घरची हलाकिची परिस्थीती घरी थांबुदेत नाही बाहेर कामाच्या शोधात येवे तर बाहेर काही हाताला काम मिळत नाही आशा परिस्थीतीत जगणे मुस्कील झाले आहे करावे तर काय करावे आणि जगावे तर कसे आसा हृदयस्पर्शी प्रश्न हलाकिच्या आर्थीक परिस्थीतीने ग्रासलेल्या पाथरी येथील बुट पाॅलीस करणार्‍या चंदुणे आमचे पाथरी येथील दै.जगमिञचे प्रतीनीधी यांच्या मार्फत उपस्थीत केला आहे
सविस्थर वृत आसे कि कोरोणा या संसर्गजन्ये आजारा पासुन आपल्या देशातील नागरीकांचा बचाव करण्यासाठी शासनाने संचार बंदी व टाळे बंदी चा आदेश लागु केला आसुन कोरोणा या संसर्गजन्ये आजाराचा व संचार बंदी टाळे बंदी याचा परिनाम हजारो हातावर पोट आसनार्‍या हजारो मोलमजुरी करणार्‍या मजुरावर झाला आहे आनेकांच्या हताला काम नाही याचा परिनाम थेट त्यांच्या कुटुुबांवर झाला आहे
शासनाने टाळे बंदी व संचार बंदी मध्ये सकाळी सात ते दुपार पर्यंत सुट दिली आहे या दरम्यान पाथरी शहरा मधिल एक विस पंच्चवीसीतील तरुन रस्त्याच्या बाजुला भर उन्हा मध्ये बसुन दादा बुट पाॅलीस करान ओ भाऊ बुट पाॅलीस करान हो फक्त पाचच रुपये द्या!ओ………….आसी केविलवानी हाक्क प्रतेक येनार्‍या जाणार्‍या व्याक्तीला देत होता हा सर्व प्रकार भर उन्हा मध्ये कुठली हि सुविधा नाही आशा परिस्थीती मध्ये बुट पाॅलीस करनारा हा तरुन जवळ पास पाऊन तास वेळे पासुन करत होता परंतु या दरम्यान त्या च्या कडे एक हि ग्राहक बुट पाॅलीस करण्यासाठी आले नाही हा सर्व प्रकार आमचे पाथरी ता.प्रतीनिधी आवडाजी ढवळे यांच्या निर्देशनास आला आसता सदर बुट पाॅलीस करनार्‍या व्याक्ती च्या जवळ जावुन विचार पुस केली आसता त्याने आपले नाव चंदु भिकाजी बरझरे रा.इंदिरा नगर पाथरी आसे सांगले आसुन घरी वृध आई वडील व दोन भाऊ आहेत वडिल बागवान यांच्या कडे रोजनदारीने कामाला जात होते आता टाळे बंदी मुळे घरीच आसतात तर आई लांकांना गोधडी(वाकळ) सीवुन देत होती ते हि बंद झाले आहे एक भाऊ हाॅटेल वर रोजनदारीने कामाला होता आता हाॅटेल बंद आसल्या मुळे त्याला हि काम नाही तर दुसरा भाउ लहान आहे परिनामी कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्यावरच येवुन ठेपली आहे,शासनाने गहु,तांदुळ दिले आहे येवढ्यावर भागनार कसे आई वडीलांचा दवाखाना,घरी जगण्यासाठी लागनारे तेल,मिठ,दाळ,भाजी पाला,औषद गोळ्या हे घेण्यासाठी पैसा कुठुन येनार आहे या साठी बाहेर बुट पाॅलीस चे काम केल्या सीवाय पर्याय नाही सेजारी पाजारी मदत कुठवर करणार म्हणुन मि बाहेर बुट पाॅलीस चे काम करण्यासाठी बाहेर पडलो आहे रोज कसे बसे ६० ते ७० रुपये तर कधी १०० रुपये मिळतात आज सकाळ पासुन केवळ पाच रुपयाचे काम मिळाले आहे गेले एक तास झाले एक हि ग्राहक नाही आणि साहेब म्हणतात घरी बसा कसे बसु घरी घरची बिकट परिस्थीती बसु देत नाही आणि बाहेर कोरोणा व साहेब येवुदेत नाही घरी राहु तर परिस्थीतीने मरन बाहेर कोरोणाने मरन भाऊ सांगा आशा भयान परिस्थीती मध्ये आम्हा गोरगरीबांनी जगावेतर कसे आसा हृदय हेलावुन टाकनारा प्रश्न बुट पाॅलीस करणार्‍या चुंदुने आमचे पाथरी येथील दै.जगमिञ चे प्रतीनिधी आवडाजी ढवळे यांच्या मार्फत दै.जगमिञ वृत्तमान पञा च्या माध्यमातुन व्याक्त केला आहे
परंतु हा प्रश्न एकट्या चंदुचाच नाही तर हजारो परिस्थीतीने ग्रासलेल्या गोरगरीब चंदुचा आहे आपल्या देशाच्या संविधानाच्या प्रस्थावीके मध्ये वंचन दिले आहे त्या वचनाची देशातील प्रतेक नागरीकांना पर्यंत आमल बजावनी केली जात आहे का? सांगता येने कठीन आहे उत्तर मिळेल तो पर्यंत आसे हजारो चंदु रस्त्यांच्या कडेला पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उध्दार होवुन भरडत राहतील का?राहिले तर याला जवाबदार कोन?हाच प्रश्न महत्वाचा आहे

312 Views

Leave a Reply

Your email address will not be published.