शाहिरासह कलावंताच्या मदतीला धावले लोकनेते सुधाकर निकाळजे

जालना (प्रतिनिधी)- लॉॅकडाऊनमुळे जालना जिल्ह्यातील ग्रामीण कलावंतावर आलेल्या उपासमारीमुळे भयभीत झालेल्या कलावंताना लोकनेते सुधाकर निकाळजे यांनी एक महिना पुरेल एवढा किराणा देऊन त्यांना प्रत्येकी 1 हजार रुपयाची रोख रक्कम देऊन मोठी मदत केलीय. दिवसभरात 25 शाहिर आणि कलावंतानी या मदतीचा लाभ घेतला. निकाळजे यांनी केलेल्या मदतीमुळे शाहिर आणि लोककलावंतानी समाधान व्यक्त केले आहे.

वाजतं तव्हा भाजतं… नाहीतर माय बापासह लुकरु सुध्दा उपासीच निजतं… असी अवस्था ग्रामीण कलावंताची आहे. पुर्वी कलावंताना राजाश्रय मिळत होता, कालांतराने या कलावंताना लोकाश्रय मिळाला. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच कामकाज बंद झाले, व्यवहार ठप्प झाले. सर्वच जन घरात कॉरंटाईन झाले त्यामुळे हातावर पोट असणारे आणि रोज कला सादर करुन मिळेत ते घरी घेऊन जाणारे कलावंत उपासमारीच्या खाईत ओढले गेले. अशा या कलावंताची व्यथा जालना जिल्ह्यातील लोकनेते आणि रिपब्लीकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी समजुन घेतली.  निकाळजे यांनी जालना जिल्ह्यातील 25 शाहिर व कलावंत यांना एक महिणा पुरेल एवढा किराणा भरुन दिला असून प्रत्येकाना 1 हजार रुपये रोख स्वरुपात आर्थीक मदत केली आहे. निकाळजे यांच्या दानशुर व्यक्तीमत्वामुळे आतापर्यंत त्यांनी लॉकडाऊनच्या काळात सुमारे 18 लाख रुपयाची लोकांना मदत केली आहे. त्यांच्यामुळे आज अनेकांच्या पोटाला पोटभर मिळाले आहे. अनेकावर आलेली उपासमार त्यांच्यामुळे दुर झाली आहे. त्यांच्या मदतीचे सर्वच स्तरातुन अभिनंतर होत असून त्यांच्या कार्यावर कौतुकाची थाप मिळत आहे.

94 Views

Leave a Reply

Your email address will not be published.