…त्या जखमी तरूणाचा मृत्यू

जालना, (प्रतिनिधी) – शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून चांदई टेपली येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या सुरेश अशोक टेपले  (वय 25) या तरुणाचा आज जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणात हासनाबाद पोलीस ठाण्यात दोन गटातील 22 जणांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल आहेत.
भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली येथे 13 मे 2020 रोजी शेतात जाण्याच्या राष्ट्याच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारी कुर्‍हाडी, फावडे, वखराच्या लोखंडी आणि तीक्ष्ण हत्याराचा वापर करण्यात आला होता. एका गटातील 15 जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत अशोक टेपले, त्यांचा मुलगा सुरेश टेपले व घरातील चार जण जखमी झालेले आहेत. अशोक टेपले व सुरेश टेपले  हे गंभीर असून त्यांच्यावर जालन्यातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरेश टेपले याचा आज दुपारी तीन वाजता डॉ. प्रल्हाद धारूरकर यांच्या परिणिका न्यूरोकेयर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. मयत तरुण हा जालना येथील मत्स्योदरी विधी महाविद्यालयात कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत होता. त्याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके हे करीत आहेत.  

205 Views

Leave a Reply

Your email address will not be published.