बहीण-भावाच्या नात्याला काळीमा; भावाने बहिणीवर केला बलात्कार

जालना (प्रतिनिधी) – नवीन जालन्यातील दर्गावेश भागातील शितला माता मंदिराजवळ रहिवाशी असलेल्या या 12 वर्षीय सख्ख्या चुलत बहिणीवर बलात्कार करणार्‍या नराधमास सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या घरातच घडली. बहीण – भावाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे.
या घटनेतील पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह नवीन जालन्यातील दर्गावेश भागातील शितला माता मंदिराजवळ राहते. तिचा चुलत भाऊ अमित बन्सीलाल ढवळे हादेखील तिच्या घराजवळच राहतो. आज सकाळी 7.30 वाजेच्या ती मुलगी तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत एकटी झोपलेली असताना अमित ढवळे याने तिच्या खोलीत घुसून बळजबरीने बलात्कार केला. त्या मुलीने सदर प्रकार तिच्या आईला सांगितलं, त्यानंतर आईने थेट सदर बाजार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी अमित ढवळे याच्याविरुद्ध भादंवि. 376 (2) (एफ) (आय) (एच) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या 3 (ए), 4, 5(एम) (एन), 6 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.

1,291 Views

Leave a Reply

Your email address will not be published.