110 कोटींची बोगस योजना राबवुन, चांगल्या रस्त्यांचे वाटोळे करून नगरपालिका प्रशासनाने काय साध्य केले ???? खोदलेल्या रस्त्याचे पॅच त्वरित पूर्ण करावेत – प्रा पवन मुंडे
परळी प्रतिनिधी :परळी तील सर्वच गल्ली-बोळातील रस्त्यांचे या गटार योजनेखाली खोदकाम करून त्यात अत्यंत छोटी पाईपलाईन टाकण्यात आली आहे,त्यात पाणी केव्हा जाईल माहीत नाही पण ते खोदलेले रस्ते मुळे नागरिक हैराण झाले आहेत,प्रत्येक भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे,नागरिकांचे खराब रस्त्यामुळे अपघात होत आहेत ,या बोगस योजनेतून नगरपालिका प्रशासनाने काय साध्य केले हे माहीत नाही पण गुत्तेदाराने फोडलेले रस्ते जशास तसे त्वरित करून द्यावेत अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरातील 110 कोटींच्या गटार योजने खाली चांगल्या रस्त्यांचे खोदकाम करून त्यात चार किंवा सहा इंच पाईप टाकत आहेत,त्या पाईपलाईन मधून गटाराचे पाणी जाईल का नाही हे महित नाही मात्र खोदकाम केलेल्या रस्त्यांच्या दुर्दशेने नागरिक मात्र हैराण झाले आहेत,अनेक भागात खोदलेले दुरुस्त केलेले नाहीत,टेंडर मध्ये खोदलेल्या रोड चे दुरुस्ती साठी चे व बजेट आहे मात्र गुत्तेदार त्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून खोदलेले रस्त्यावर फक्त मुरुमाची मालपट्टी करून काम धकवले जात आहे तरी या परिस्थिती मुळे गल्ली-बोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात होत असून , नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे नगरपालिका प्रशासनाने थांबवावे अशी मागणी भाजपा चे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे