ग्रामीण भागातील अवैध दारू तात्काळ बंद करा- शुभम देशमुख

परळी : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशात संपुर्ण लॉकडाउन असताना देशासह राज्यभरात बिअर बार सह वाईन शॉप बंद आहेत.सर्व वाईन शॅप बंद असल्यामुळे तळीरामाचे हाल होत आहेत म्हणुन आता काही तळीराम महाभागांनी आपआपली नशा पुर्ण करण्यासाठी आता हातभटटी दारूचा वापर सुरू केला असुन अनाधिकृत हातभटटी बनवणारे अडडे हे सरासरी ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे अवैध दारूविक्रिमुळे गोरगरीब लोकांचे संसार उध्दवस्त होत असुन पोलिस प्रशासनाने याच्याकडे वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे अन्यथा अनेकांचे संसार देशाधडीला लागतील सध्या लौकडाउनमुळे पुर्ण व्यवहार बंद आहेत हातावर पोट  असणारे आर्थिक अडचणीत आहेत त्यात दारू पिण्यासाठी आगाऊ खर्चामुळे गोरगरीबांचे संसार उध्दवस्त होण्यापासुन रोखले पाहिजे असे  आवाहन ता.युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस शुभम देशमुख यांनी केले आहे

88 Views

Leave a Reply

Your email address will not be published.