मंठा येथील राजेश राठोड यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी…!

मंठा : मंठा येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी विधान परिषद सदस्य शिक्षणमहर्षी धोडीराम राठोड यांचे चिरंजीव माजी समाजकल्याण सभापती राजेश राठोड यांना शनिवार दि. 9 मे रोजी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून राठोड यांच्या एकमेव नावाची घोषणा केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवार दि. 8 मे रोजी रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके व नांदेड येथील डॉ. अजित गोपछडे यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेमधून खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, निलम गोर्हे, राष्ट्रवादी अमोल मिटकरी व शशिकांत शिंदे यांची नावे पुढे केली आहे. यात काँग्रेसच्या वाटयाला एकच जागा मिळण्याची शक्यता होती. कालपर्यंत काँग्रेसकडून दोन उमेदवार दिले जातील, अशी चर्चा होती. यासाठी अनेक दिग्गजांची नावे पुढे आली होती. मात्र शनिवार दि. 9 मे रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य व नंतर समाजकल्याण सभापती राहिलेल्या राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. माजी आमदार धोंडीराम राठोड हे काँग्रेसचे जेष्ठ नेते, असून त्यांचा बंजारा समाजात प्रभाव आहे.

204 Views

Leave a Reply

Your email address will not be published.