शहरातील महेबुबीया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद करीम सय्यद यासीन यांचे दुःखद निधन…!
परळी : शहरातील नामवंत शिक्षण संस्था महेबुबीया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद करीम सय्यद यासीन वय 102 यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन दिनांक 09/05/2020 रोजी रात्री अकरा वाजता झाले.
ते 1975 ते 1985. आणि 1991 ते 1996 पर्यंत परळी नगरपालिकेचे नगरसेवक होते.त्यांनी एतेखाद पुरा (पेठ मोहल्ला) मस्जिद चे मुतवल्ली तसेच त्यांनी मजूर संघाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच त्यांना मराठवाडा साथी तर्फे परळीहून भूषण पुरस्कार ही मिळाला. त्यांनी आपल्या हयातीत आयुष्यभर कांग्रेस च्या माध्यमातून राजकीय व सामाजिक सेवा केली. ते परळीत उर्दु शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या पश्चात तिन मुले, चार मुली व तसेच सुना ,जावाई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.