राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांची लागली लॉटरी…!
अंबेजोगाई : अंबेजोगाई येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व शिक्षणमहर्षी राजकिशोर मोदी यांची शनिवार दि. 9 मे रोजी विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मोदी यांच्या एकमेव नावाची घोषणा केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी होणार्या निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवार दि. 8 मे रोजी रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके व नांदेड येथील डॉ. अजित गोपछडे यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेमधून खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, निलम गोर्हे, राष्ट्रवादी अमोल मिटकरी व शशिकांत शिंदे यांची नावे पुढे केली आहे. यात काँग्रेसच्या वाटयाला एकच जागा मिळण्याची शक्यता होती. कालपर्यंत काँग्रेसकडून दोन उमेदवार दिले जातील, अशी चर्चा होती. यासाठी अनेक दिग्गजांची नावे पुढे आली होती. मात्र शनिवार दि. 9 मे रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने बी जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील काँग्रेसकडून काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पापा मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.