मुस्लिम समाजाने रमजान ईद ची खरेदी टाळून गरिबांना मदत करावी – अॅड.सय्यद अजीम
बीड : देशावर आलेल्या कोरोना या महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला असुन त्यामुळे राज्यामध्ये आज आपण सुरक्षित आहोत याच पार्श्वभूमीवर आपण देखील योग्य निर्णय घेण्याची भुमिका पार पाडावी लागणार आहे याचा सर्वांनी भान ठेवला पाहिजे.
भारतातच नव्हे तर जगात कोरोना सारख्या माहामारीने थैमान
घातलेला असल्याने मुस्लिम समाजाने ईद साठी खरेदी करने टाळावे व गरीब लोकांना त्या पैश्यांने मदत करावी नक्कीच आपल्या कडुन गरिबांना मदत होईल व पवित्र रमजान महिन्यात गरिबांची दुवा आशीर्वाद आपल्याला मिळेल
पवित्र रमजान ईदच्या निमित्त आपण दरवर्षी नवीन खरेदी करतो परंतु या वर्षी असं काहीच न करता आपले शेजारी किंवा गरीब नातेवाईक यांना अन्न धान्य द्या त्यामुळे त्या लोकांना तुमच्या कडुन मदत होईल व त्यांच्या घरात देखील सन साजरा होईल.
कोरोना सारख्या आपत्तीला आपल्याला मात करायचा असेल तर आपण बाहेर न पडता, गर्दी न करता ,सोशलडिस्टन्स ठेवून आपल्या मुलभुत गरजांची खरेदी केली तरी चालेल परंतु विनाकारण घरा बाहेर न पडता आपला जिल्हा आपण सुरक्षित ठेवू शकतो.
म्हणून माझी संपूर्ण बीड जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण शक्यतो आपल्या घरच्या महिलांना घराबाहेर जाण्यासाठी थांबवावे. “घरी राहु,सुरक्षित राहू” असे आपण निर्धार करूया व अतिशय साधेपणाने आपली ही ईद साजरी करूया…..