बीड जिल्ह्यासाठी आनंद वार्ता ; 10 जन कोरोणा मुक्त….
बीड : एकीकडे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे कोरोनावर मात करणार्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आतातरपर्यंत पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली . तर आज आणखी जिल्हारुग्णालयातून आठ तर केजमधून 2 असे दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज उशिरा घरी सोडण्यात येणार असल्याने ही आनंदाची बातमी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 62 झाली असून गेल्या पंधरवाड्यात एका कोरोनाबाधीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 6 उपचारार्थ पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. पाच जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बीड जिल्ह्यात 50 कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दहा रुग्णांना आज घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. त्यामुळे आत बीडमध्ये 40 रुग्णावर उपचार सुरु राहणार आहेत. तर आज जिल्ह्यातून 38 स्वॅब पाठवले असून त्याचा रिपोर्ट काही तासात येणार आहे.