बालाजी आयुर्वेदिक औषधालय येथे मोफत आयुष काढा वाटप
बदनापुर (प्रतिनिधी ) – स्वर्गीय श्री कैलास गोपीकिशन दाड यांच्या पुण्यतिथी निमित्त 23/7/20 रोजी श्री बालाजी आयुर्वेदिक औषधालय येथे मोफत आयुष काढा वाटप शिबिर संपन्न झाले. बदनापुर शहरातील डॉ. सुरेशजी कासट, समाज भूषण सांडूजी कांबळे, अडतचे व्यापारी सुरेश कुमार मंत्री, पत्रकार आनंद इंदानी, शांतिदेवी शिर्के शाळेचे मुख्याध्यापक उगलमुगले सर व शाळेचे शिक्षक आर्सूड सर, आरपीआय चे तालुकाध्यक्ष नयुम बेग, उसमानभाई ढासलाचे मा. सरपंच तसेच बदनापुर तालुक्यातील उज्जैनपूरी , सोमठाना, कुसळी, देवगांव,ढासला,धोपटेश्वर, वकुळनी, तसेच इतर गावामधून सोशीअल डिस्टनसी सर्व नियमाचे पालन करून काढ़ाचा आनंद घेऊन सौ. मनिषा दाड व शिवप्रसाद दाड यांचे कौतुक केले.