*बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम संघटनेच्या* प्रदेश उपाध्यक्ष पदी भरत मुंडे यांची निवड
दिनांक १९/०५/२०२१ रोजी झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला माननीय श्री शिवाजी वायफळकर साहेब केंद्रीय अध्यक्ष यांनी श्री भरत मुंडे यांची निवड प्रदेश उपाध्यक्ष पदासाठी सदर बैठकीमध्ये केली . श्री मुंडे यांनी या अगोदर परिमंडळ अध्यक्ष पुणे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बहुजन फोरम या पदावर काम केले आहे.कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध श्री मुंडे यांनी आवाज उठून त्यांना न्याय मिळवून दिला आहे पदोन्नती, बदल्या इत्यादी कामे संघटनेच्या माध्यमातून केल्यामुळे त्यांची सदर पदी निवड करण्यात आले आहे. सदर निवडीबद्दल बद्दल श्री मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.