प्रमिलदेवी पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी!
नेकनूर : प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ने महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रो.डॉ. देशमुख आर.के व प्रा लोमटे आर. एल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रम साठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते.
सुत्र संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मुजावर एस.टी.यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा.विजय मस्के यांनी मानले. या अभिवादन कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक,व इतर कर्मचारी ही उपस्थित होते.