परळी शहरात संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवा चालू राहणार ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार
परळी : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे पाच अधिकारी व कर्मचारी हे कोविंड 19 पॉझिटिव आढळून आले असून बँकेमध्ये परळी शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ये-जा झाली असून प्रतिबंधात्मक उपायोजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे.संचारबंदी कालावधीत कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे . संचारबंदीत पुढील प्रमाणे अत्यावश्यक सेवा चालू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
संचारबंदी काळात पुढील प्रमाणे अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे, व माध्यम सेवा 24 तास सुरू राहतील . परळी शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीमध्ये प्रवेश करता येणार नाही शहराबाहेरही जाता येणार नाही .शहराबाहेर जाण्यासाठी व बाहेरून शहरात येण्यासाठी काढण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत .अत्यावश्यक सेवेची शासकीय कार्यालय वगळता महसूल ,पोलीस, ग्रामविकास, नगर विकास ,कृषी व आरोग्य, उपकोषागार ,न्यायालयातील कर्मचारी ,परळी वैजनाथ शहरातील अस्थापना इत्यादी बंद राहतील. वरील 8 विभागाचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्र द्वारे शहरांतर्गत प्रवास करू शकतील. परळी शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही परंतु मेडिकल इमर्जन्सी मधील पास साठी परळी शहरातील नागरिकांनी www.covid19.mhpoilce.in या वेबसाईटवर अर्ज भरून इ पास प्राप्त करून घ्यावा.
परळी शहरातील सर्व नागरिकांनी आरोग्य शेतू ॲप तात्काळ डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील.कोरोनाविषाणू च्याअनुषंगाने ताप ,सर्दी ,खोकला, डोकेदुखी व श्वसनाचा त्रास इत्यादी लक्षणे आढळून आल्यास सदरील ॲपमध्ये Self Assessment या टॅब मधील माहिती तात्काळ भरावी.
फिरते विक्रेते यांना परवानगी राहील. कोणत्याही दुकानदारा मार्फत दूध विक्री केले जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही, त्यांनी पाकिटाची होम डिलिव्हरी करावी .ती करत असताना कोविंड अनुषंगाने सामाजिक आंतर याचे पालन करावे .
वाटर सप्लायर्स यांनी पाणी वाटप न करता ग्राहकांकडे उपलब्ध भांड्यामध्ये पाणी द्यावे किंवा संपूर्ण ग्राहकांना जार द्यावा व रिकामा जार परत न घेता त्याच्यामध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी .सर्व वाटर सप्लायर्स कर्मचारी यांनी पास काढून घ्यावे.
परवानाधारक भाजी व फळ विक्रेते यांनी घरोघरी जाऊन भाजी व फळे विक्री करावी. घरगुती गॅस घरकुल घरपोच सेवा देताना कंपनीचा गणवेश परिधान करावा .गणवेश नसलेले कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढावा. मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी पास काढून घ्यावा. वैद्यकीय कर्मचारी व औषध विक्रेत्यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन पास शहरांतर्गत प्रवासास परवानगी आहे.
पोस्ट ऑफिस व बँका केवळ अंतर्गत महत्त्वाच्या कामकाजासाठी चालू राहतील. कोणत्याही ग्राहकाला प्रत्यक्ष सेवा देता येणार नाही पोस्ट ऑफिस कर्मचारी यांनी स्वतःचे ओळखपत्र वापरून प्रवास करावा. टॉवर जवळील स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा –परळी ग्रामीण( कोड 3406 )ही बँक संपूर्ण बंद राहील. अंत्यविधीसाठी शासनाचे परिपत्रकात नमूद केल्यानुसार परवानगी असेल .
परळी औष्णिक विद्युत केंद्र चालू राहील येथील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वापरून काम करता येईल .धर्मापुरी रोड वरील परळी वैजनाथ येथील इंडिया सिमेंट फॅक्टरी येथे कमीत कमी कर्मचारी , कामगार यांना उपविभागीय अधिकारी यांच्या शिफारशीनुसार परवानगी असेल. सर्व प्रकारची मालवाहतूक रेल्वेची मालवाहतूक या अनुषंगाने परळी शहरातील हद्दीतील गोदामे चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. काम करणारे कर्मचारी, हमाल त्यांचे ओळखपत्र वापरून कामकाज करू शकतील असे आदेशात नमूद केले आहे.
कोवीड-१९ चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षता घेता संपूर्ण परळी शहरामध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणेत आली आहे. तसेच जिल्ह्यात देखील फौजदारी प्रक्रिया दंड संहिता
१९७३ चे कलम १४४ नुसार दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा पर्यंत प्रतिबंधात्मक लागू करण्यात आले आहे, सदर आदेश या आदेशासह लागू राहतील.