परळीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर आयोजित चित्रकला स्पर्धा ; 08 जून पर्यंत आपले चित्र पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा- अनंत ढोपरे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या 21 व्या वर्धापन दिना निमित्त निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लाँकडाऊनचा चौथा टप्पा 30 जून पर्यंतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच दरम्यानच्या काळात वाचन व लेखन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांनसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिना निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून व परळी नगरपरिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड ,परळी नगरपरिषद माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मा.बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या आदेशावरून व राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीस अनंतराव इंगळे व पाणीपुरवठा सभापतीश्रीकृष्ण (भाऊड्या) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रकला स्पर्धेत विषय: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा माझा आवडता नेता या विषयावर चित्र काढून स्पर्धेत प्रवेश घेऊन अंतिम तारीख निबंध पाठवण्याची अंतिम दि.08 जून 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत. यामध्ये उत्कृष्टपणे चित्र काढणाऱ्या चित्रास प्रथम बक्षीस-पारितोषिक व प्रमाणपत्र द्वितीय बक्षिस- पारितोषिक व प्रमाणपत्र तृतीय बक्षीस पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी सर्व सहभागी स्पर्धकांनी चित्र काढून वर अनंत गणेशराव ढोपरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस 9551258555 या मोबाईल क्रमांकावर स्वच्छ फोटो काढून व्हाट्स अप मोबाईलवर पाठवावेत.ज्यांना क्रमांक येऊन बक्षीस मिळेल त्यांचे चित्र सर्व स्पर्धकांना व्हाट्स अप मोबाईल केले जातील….🙏