अंबाजोगाईतील ‘त्या’ २८वर्षीय तरूणाचा कोरोणामुळे मृत्यू.
अंबाजोगाई : भावाकडे आलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील२८वर्षीय तरुण कोरोणा पाँझिटीव्ह शुक्रवारी(दि.२६)निष्पन्न झाले होते.या तरुणाचा अंबाजोगाई येथील
स्वा.रा.ती.रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
मुळचा गिरवली (ता.भुम)जि.उस्मानाबाद येथील हा तरूण ट्रकचालक होता.त्याचा भाऊ अंबाजोगाई शहरातील आनंदनगर भागात राहतो हा तरुण मागील आठवड्यात त्याच्या भावाकडे आला होता.सर्दी आणि ताप सुरु असल्याने दुसरया दिवशी अंबाजोगाई शहरातील एका खाजगी रूग्णालयात गेला होता,डॉ क्टरांना शंका आल्याने त्याला शासकीय रुग्णालयात पाठविले,तिथे त्याचा थ्रोट स्वँब तपासला असता तो कोरोणा पाँझिटिव्ह असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती रूग्णालयात उपचार सुरु होते आज मंगळवारी दुपारी त्या तरूणाचा मृत्यू झाला.