घोटा येथील पिकांचे सततच्या पाऊसामुळे व पुरामुळे नुकसान
दिपक मापारी प्रतिनिधी रिसोड रिसोड तालुक्यातील घोटा परिसरात पडत असलेल्या सततच्या पाऊसामुळे शेतकऱ्याचे बहूतांश ठिकाणी शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. हाताला आलेल्या सोयाबीन जागेवरच दिसत आहेत. या वर्षी समाधकारक पाऊस व योग्य संगोपन यामुळे पिके बहरली होती. मात्र सततच्या पाऊसामुळे घोटा परिसरातील मुंग,उडीद,सोयाबीन ई. पिकांना फटका बसला असुन शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने सोयाबीन पिके पिऊळी पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.