अल्पवयीन मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून
कुंडलवाडी (प्रतिनिधी) – कुंडलवाडी येथील राम गल्ली मध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या वडीलास दि. 04 जुन रोजी रात्री 9. 30 वाजण्याचा सुमारास घरात असलेल्या लोखंडी हातोडीने डोक्यात वार करून हत्या केली. कुंडलवाडी येथील राम गल्ली मध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपले वडील साहेबराव बापूराव कदम वय ( 50 ) वर्ष हे दारु पिण्यासाठी व पत्ते खेळण्यासाठी घरामध्ये सतत पैसासाठी तगादा लावून त्रास देत असत या त्रासाला कंटाळून आरोपी अल्पवयीन मुलाने दि. 04 जुन रोजी रात्री 9=30 वाजण्याच्या सुमारास वडील साहेबराव कदम झोपले असताना घरातील लोखंडी हातोडीने डोक्यात वार करुन जिवे मारल्याची घटना घडली.याबाबत फिर्याद मयताची पत्नी कांताबाई साहेबराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे हे करीत आहेत.