अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून चंदनझिरा पोलिसांनी केल्या 2 तलवारी जप्त
जालना (प्रतिनिधी) – संचारबंदीदरम्यान चंदनझिरा परिसरात एकजण तलवार घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीनुसार एकता चौकाजवळील एका गल्लीत सापळा लावला असता त्याठिकाणी एक मुलगा तलवारी घेऊन जाताना पोलिसांना पाहून पळून जात असताना त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
यावेळी विधिसंघर्ष मुलाच्या ताब्यातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहे.
तलवारी घेऊन फिरण्याचे कारण विचारता माझ्या मित्रांना दाखवण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती त्याने दिली.
पोलीस कर्मचारी अनिल काळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे चंदनझिरा येथे विधिसंघर्ष मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, रमेश चव्हाण, अनिल काळे, विजय साळवे, अजय फोके, होमगार्ड खुळे यांनी केली आहे.