२२ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या.
पुर्णा (२५ सप्टेंबर) – शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तालुक्यात हळुवारपणे ‘मुळसी पेटर्न’ या सिनेमास्टाईलचा क्रेज वाढत चालला असून अत्यंत कमी वयातील मित्र मंडळांच्या नावावर तरूणांच्या टोळ्या सक्रीय होतांना पाहावयास मिळत असून एक दिवस या तरूणांच्या टोळ्या शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात असून शहरात किरकोळ कारणावरून गंभीर गुन्हे घडू लागल्याचे निदर्शनास येत आहे. असाच एक गंभीर प्रकार काल गुरूवार दि.२४ सप्टेंबर २०२० रोजी शहरातील रेल्वे कॉर्टर परिसरात घडला दारू पिण्यास पैसे का देत नाही या अगदी शुल्लक कारणावरुन सायंकाळी ०६-१५ वाजेच्या सुमारास दोघांनी मिळून नितीन गणेश खर्गखराटे या २२ वर्षीय तरुणाची फोन करून बोलावून दारू पाजून धारदार कटरच्या साह्याने गळा चिरून निर्घृन हत्या केल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने संदर्भात मयत तरुणाची बहिण दिपीका गणेश खर्गखराटे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विकास चौदंते व रोषण इंगोले या दोघांच्या विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात गुरनं.९७/२०२० कलम ३०२,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..