१०,१२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रतिनिधी : दानिश
अंबड येथील जनसंपर्क कार्यालयात स्वामी रामानंद शिक्षणप्रसारक मंडळाच्या वतीने अंबड तालुक्यातील १०वी आणि १२वी च्या गुणवंत विद्यार्थींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी संचालक श्री विनायक भैय्या चोथे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व गुलाब देत अभिनंदन तसेच पालकांना शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. जागतिक कोरोना महामारी मुळे मोठ्या प्रमाणात आयोजन न करता जि.प.सर्कल निहाय कौतुक सोहळ्यांच आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येत असून त्यांचाच भाग म्हणून आज पहील्या टप्प्यात पारनेर व ताडहदगाव जि प सर्कल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार सोहळा पार पडला.यावेळी श्री संभाजी उबाळे, दिनेश काकडे, प्रवीण पवार, अशोक गिरी, रावसाहेब पवार, परमेश्वर वाघुंडे, सदाशिव लेकुरवाळे, श्याम राठोड,अनीस तांबोळी, अंबादास मुळे, सतीष धुपे, कृष्णा टोम्पे, सचिन शेरे, संतोष अंबिलादे, सतीष जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
