होय धनुभाऊ माझे दैवतच, त्यांच्या मुळे करोनातून बाहेर आलो
काय लिहावे कुठून सुरुवात करावी ह्या माणसाबद्दल आणी कितीदा लिहावे कितीदा कृतज्ञता व्यक्त करावी ? जगात सध्या कोरोना ह्या रोगाने थैमान घातलेले आहे लहान मोठा गरीब श्रीमंत सर्वच ह्या रोगाच्या तावडीत कधी ना कधी सापडलेत आणि सापडत आहेत मग मी तरी कसा अपवाद राहू शकतो, मी हि बर्याच इतर लोकांप्रमाणे भ्रमात होतो मला काहीही होणार नाही मी योग्य ती काळजी घेत आहे पण ह्या रोगाने गाठलेच दि.06/09/2020 सोमवार ला मला ताप व खोकला आला मंगळवारी तोंडाची चव गेली वाटले ताप असल्याने चव लागत नसेल पण मनात शंका होतीच म्हणून घरातच विलग झालो बुधवारी अँटिजेन टेस्ट केली ती निगेटिव्ह आली पण लक्षण तीव्र होती म्हणून RT PCR केली तिचा रिपोर्ट 2 दिवसानी येणार होता शुक्रवारी खोकला वाढला म्हणून माझे अकलूज येथील मित्र डॉ. महामुनी एमडी होमियोपॅथी बीड येथील मित्र डॉ.अशोक मोरे व तळा पीएचसी येथील डॉ. देशमुख यांच्या सांगण्यावरून सिटी स्कॅन केले त्यात फुफ्फुसात इन्फेक्शन आढळले आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वा रिपोर्ट ही पोजिटिव्ह आला 4 दिवसात ऑक्सीजन लेवल हि कमी व्हायला सुरुवात झाली,खोकला वाढत होता, दम लागायला सुरुवात झाली होती मग सुरू झाला दवाखण्याचा शोध माझे माणगांव मधील मित्र पराग पात्रीकर,कपिल गायकवाड ,जयेश सावंत कॉन्स्टेबल स्वप्नील कदम यांनी मुंबईतील पुण्यातील जवळपास प्रत्येक दवाखान्यात फोन केले पण कुठेच बेड भेटत नव्हता माझा त्रास ही वाढत होता संबंधातल्या डॉक्टरांनी तात्काळ मुंबई ला हलवण्यास सांगितले वडिलांना पराग पात्रीकर ह्या माझ्या मित्राने फोन करून सर्व परिस्थिती सांगितली सर्व मित्रांनी त्यांना धीर दिला व बीड मधून मुंबईकडे निघायला सांगितले ह्या सर्व गोष्टींमध्ये वेळ जात होता पण दवाखाना भेटत नव्हता मी औषध घेतल्याने मला झोप लागली होती रात्री 2:30 वाजले मित्रांचे सर्व प्रयत्न करून झाले तरीही दवाखाना भेटत नव्हता म्हणतात कठीण समयी देव आठवतो तसा माझ्या मित्रांना माझे नेते सामाजिक न्याय मंत्री धनुभाऊ आठवले रात्री 2:30 वाजता त्यांना फोन करायचा की नाही ह्या द्विधा मनस्थितीतही त्यांनी फोन करण्याचा निर्णय घेतला धनुभाऊंनी फोन उचलला आणि त्यांना म्हणाले अर्धा तासात मी व्यवस्था करतो बरोबर 25 मिनिटात धनुभाऊंचा परत कॉल आला चर्णी रोड येथील सैफी हॉस्पिटलमध्ये माझे बोलणे झाले आहे तुम्ही आत्ताच्या आता एमबुलन्स बघा आणि अमितला पाठवा आता अमितला नीट करायची जबाबदारी माझी.ह्या हॉस्पीटल शोधण्यात दोन अदृश्य हाथांनी खूप मोठे काम केले मदत केली ते म्हणजे धनुभाऊंचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी आणि धनुभाऊंनी जी फक्त कोविडसाठी जी टीम तयार केली आहे त्या टीम मधले संतोष धीवर ह्यांनी,आता शोध सुरू झाला एमबुलन्सचा इथेही मित्रच कामाला आले माणगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले स्वप्नील कदम , शिंदे ह्यांनी रात्री अर्धा तासात एमबुलन्स बघीतली आणि त्यात बसतांना ही सर्व मित्र तिथेच होते माझा 4 वाजता प्रवास सुरु झाला मनात खूप विचार होते भीती ही होतीच पण म्हणतात आप्तस्वकीयांचे पाठबळ असेल आई वडिलांचे आशीर्वाद असतील,पराग पात्रीकर,कपिल गायकवाड ,जयेश सावंत कॉन्स्टेबल स्वप्नील कदम वैभव भिंगारे ह्यांच्या सारखे मित्र सोबत असतील आणि धनुभाऊं सारखा पाठीवर हाथ ठेवून लढ मी आहे म्हणणारा नेता सोबत असेल तर लढायची ऊर्जा भेटते. 8 वाजता दवाखान्यात पोहोचलो माझ्या आधी माझे वडील दवाखाण्याजवळ आलेले होते लांबूनच एकमेकांना बघितले ते त्यांच्या डोळ्यातले पाणी लपवत होते आणि मी माझ्या पण त्यांच्या लांबुन दर्शनानेही 100 हत्तीचे बळ अंगात आले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर लगेच ऑक्सीजन लावण्यात आले आणि उपचार सुरू झाले 4 दिवसांनी ऑक्सीजन काढले त्रास कमी होत होता मला दवाखान्यात समजले की धनुभाऊंचा व त्यांच्या मेडिकल टीमचा रोज एक तरी फोन दवाखान्यात यायचा माझ्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने,प्रेमाने व सदिच्छा पाठीशी असल्याने मी ह्या महाभयंकर रोगाला पराभूत करून 20/09/2020 ला सुखरूप घरी परत आलो. ह्या सर्व प्रवासात खूप शिकायला भेटले खूप अनुभव आले सर्वांच्या सदिच्छा, सर्वांचे प्रेम ,आईवडिलांचे आशीर्वाद,मित्रांची साथ आणि धनुभाऊंसारखा पाठीराखा असण्याचे महत्व परत एकदा माझ्या जीवनात अधोरेखित झाले . डिस्चार्ज झाल्यावर धनुभाऊंना आभार मानण्यासाठी फोन केला तर हा अजब रसायनातून बनलेला माणूस मी धन्यवाद म्हणताच चक्क चिडला कारण काय तर तुम्ही माझ्या घरातील कुटुंबातील एक सदस्य आहात आणि तुम्ही धन्यवाद काय म्हणताय आभार कसले माणताय तेव्हा वाटले बीड जिल्ह्याला खरंच एक पालक भेटलाय जो प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्य मानतो एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो कोरोनाला हरवणे अवघड नाही फक्त न घाबरता धीर न सोडता ह्या संकटाला सामोरे गेलात ना तर हा कोरोना हरणारचं आणि आपल्याला त्याला हरवायचंच आहे.फक्त लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि दवाखान्यात जायला टाळाटाळ करू नका…. अमित उजगरे