हिंगणा येथे गरजू लोकांना जिवानाश्यक सामुग्री चे वाटप…!
हिंगणा : बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा तथा मानव अधिकार संरक्षण मंच यांच्या संयुक्त सहकार्याने जरूरतमंद लोकांना जिवानाश्यक सामुग्रीचे वाटप करण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टी २ महिन्यापासुन गरजू लोकांना मदत करत आहे. सुरेश मानवटकर (माजी नागपूर जिल्हा सदस्य बसपा) महेश वासनिक (कोषाध्यक्ष हिंगणा विधानसभा बसपा) शितल मंडपे (माजी महिला आघाडी अध्यक्ष हिंगणा विधानसभा) स्वप्नील ढवळे, अनिकेत तामगाडगे, प्रमोद डुले, बंडु वानखेडे, यांच्या संयोगाने भिमनगर, वानाडोंगरी, परिसरातील अंत्यत गरजू लोकांना जिवानाश्यक सामुग्रीचे वाटप करण्यात आले आहे.
यांच्यापूर्वी वधाडामना, पडोले ले वानाडोंगरी, विश्वकर्मा नगर, राजीव नगर, पंचशील नगर हिंगणा या परिसरात लोकांना जिवानाश्यक सामुग्रीचे वाटप करण्यात आले होते. व बाहेर गावातुन शिक्षणासाठी आलेल्या मुलाना, मुलींना सुध्दा मदत करण्यात आली आहे.
आमच्या प्रमुख उद्देश आहे की ज्या लोकांना दोन वेळच जेवण भेटत नाही अशा गरजू लोकांना जिवानाश्यक सामुग्रीचे वाटप करण्यात येत आहे.