स्वच्छता कर्मचार्यांमुळे संसर्गजन्य आजार आटोक्यात : दानवे

जालना ( प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाच्या लढाईत स्वच्छता विभागाचे अधिकारी व  कर्मचारी नियमित, वेगवान स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारणी मोहीमेसह प्रतिबंधक उपाययोजना करत असल्याने जालना शहर संसर्गजन्य आजारापासून आटोक्यात राहिले आहे. असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्करराव पाटील दानवे यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केले. 
नगरसेविका सौ. संध्याताई संजय देठे यांच्या वतीने प्रभाग क्रं. २२ व २३ मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा  बुधवारी ( ता. ०६) मास्क व सॅनिटाइजर देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भास्करराव दानवे बोलत होते. उपनगराध्यक्ष राजेश राऊत, गटनेते अशोक अण्णा पांगारकर, उद्योजक अर्जुन गेही,सिध्दीविनायक मुळे, बद्रीनाथ पठाडे, नगरसेविका सौ.संध्याताई देठे,इंजि.विष्णू डोंगरे,संजय देठे, स्वच्छता विभाग प्रमुख संजय वाघमारे, स्वच्छता निरिक्षक सॅमसन कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
भास्करराव दानवे पुढे म्हणाले की, कोवीड -१९ या  संसर्गजन्य रोगास अटकाव करण्यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य, पोलीस व स्वच्छता विभागाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत असून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासह त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सौ. संध्याताई देठे यांनी पुढाकाराने राबविलेला उपक्रम नवी उर्जा देणारा आहे. असे भास्करराव दानवे यांनी नमूद केले. उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या देठे दाम्पत्याने तळागळात काम करणाऱ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना कार्यप्रवण केले. असे राजेश राऊत यांनी सांगितले. अशोक अण्णा पांगारकर म्हणाले, प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी सभागृहात आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नगरसेविका सौ. संध्याताई देठे यांनी सर्व प्रथम पुढाकार घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उत्साह वाढविला आहे असे पांगारकर यांनी नमूद केले. नगरसेविका सौ संध्याताई देठे यांनी लॉकडाऊन काळात कोरोनाच्या फैलावापासून बचावासाठी प्रभागात नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम राबविली असून गरजवंतांना दानशूर, संस्था यांच्या मार्फत मदत केली असल्याचे सौ. संध्याताई देठे यांनी सांगितले. सुञसंचालन संजय देठे यांनी केले तर सिध्दीविनायक मुळे यांनी आभार मानले. या वेळी स्वच्छता विभाग प्रमुख संजय वाघमारे, स्वच्छता निरिक्षक सॅमसन कसबे, दफेदार रवींद्र कल्याणी, कर्मचारी हबीब बेग,काशीनाथ लोखंडे, इम्रान बेग, छायाबाई रत्नपारखे, गोपाबाई बोर्डे, सुनिता जगधने, साबेरा बी, पार्वताबाई गोफणे यांच्या सह कर्मचाऱ्यांचा सोशल डिस्टन्सींग चे पालन करून सत्कार करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *