स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची जुगार ;अड्ड्यावर कारवाई!
बीड : पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने अमळनेर परिसरात पत्ते खेळणाऱ्या 13 इसमांना शनिवारी अटक केली .त्यांच्याकडून तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
पथकास मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर भागात जनार्दन पवार यांच्या शेतात श्रीपती गाडे हा काही लोकांना घेऊन पत्ते खेळत असल्याचे समजले .पोलिस पथकाने या ठिकाणी छापा घातला असता दिनकर नागरगोजे, दिलीप गर्जे,पपु राख,शिवाजी पवार,सदाशिव मोटे, नारायण नागरगोजे,ज्ञानोबा नागरगोजे,अशोक पवार,सोमनाथ पवार,राजाभाऊ लोकरे,योगेश पोकळे,कर्ण बेद्रे, अरबाज बागवान हे इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले .
यावेळी पोलिसांनी तब्बल अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला,ज्यात 80 हजार रोख रक्कम,मोबाईल,मोटारसायकल अस आदी साहित्य जप्त केले.
मुंबई जुगार कायद्यानुसार या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे .
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक बीड श्री हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे,पो.नी. भारत राऊत स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी आनंद कांगुणे,पोना झुंबर गर्जे,पोना संतोष हंगे,पोकॉ अन्वर शेख,पोकॉ गोविंद काळे,पोना चालक गहिनीनाथ गर्जे यांनी केलेली आहे