सौ.पंकजाताई मुंडे यांच्या निवडीमुळे कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य-राजेश गित्ते
परळी वै. माजी ग्रामविकास मंत्री सौ.पंकजाताई मुंडे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे पक्ष वाढीसाठी मोठे योगदान लाभणार आहे. अशी प्रतिक्रीया भाजपाचे जेष्ठ नेते राजेश गित्ते यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पदी माजी ग्रामविकास मंत्री सौ.पंकजाताई मुंडे यांची निवड झाल्याबद्दल राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे जेष्ठ नेते राजेश गित्ते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी करून आंनद उत्सव साजरा केला. याप्रसंगी राजेश गित्ते म्हणाले की, सौ.पंकजाताई मुंडे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष वाढीसाठी योगदान लाभणार आहे.