सौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार
कुंडलवाडी प्रतिनिधी कुंडलवाडी नगरपरिषद अध्यक्षा डाॅ.सौ.अरूणा कुडमूलवार यांना नूकतेच महाराष्ट्र शासनाने अनर्ह केले.कारण त्यांनी एक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केले या सबंधी आदेश काढले तसे अहवाल जिल्हाधिकारी यांना कळविले.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दि.7 सप्टेंबर रोजी लेखी आदेश काढून अध्यक्ष पदाचा पदभार उपाध्यक्षाकडे सोपवून अनर्ह झालेल्या आदेशाची माहिती देण्याचे मुख्याधिकारी यांना दिले.मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष पदाचा पदभार उपाध्यक्षाकडे दिल्यांचे लेखी अहवाल सादर करून माझ्याकडे अध्यक्ष पदाचा पदभार दिली.पण मला पत्रकारांचा माध्यमाने सबंधीतांना आवहान करायचे आहे.एकाच घरातील अध्यक्ष व उपाध्यक्ष असताना अध्यक्षाना अनर्ह केले असता उपाध्यक्षाकडे अध्यक्षपद जाते हे सर्वांना माहित आहे.हे काही सिक्रेट नाही.कायदा मराठीत पण लिहलेला आहे.कोणीही वाचू शकतो.मला वाटते हे आमच्या विरोधात विशेष एक षडयंत्र चालू होते की डाॅ.कुडमूलवार यांना शहरातील विकास कामेकरू देवूनये.पण अध्यक्ष पदावरून सौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले.असे डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारून पत्रकार परिषदेत प्रतीपादन केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शेख जावेद अजीज,भाजप तालूका सरचिटणीस हणमंलू ईरलावार,जेष्ठ नगरसेवक पंढरीनाथ दाचावार,गंगाधर खेळगे,अशोक पाटील वानोळे,पंढरी पुपलवार,सयारेड्डी पुपलवार,पोशट्टी पडकुटलावार,गंगाप्रसाद गंगोणे,सचिन कोटलावार,संजय भास्कर,नरेश जिठ्ठावार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डाॅ.कुडमूलवार म्हणाले.आपण सर्व याच गावातील सुपूत्र,गेल्या न.प निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता देण्यामध्ये सर्वांचा सहभाग होता.80% मतदार मोठ्या अपेक्षेने मतदान केले होते.आमच्या गेल्या चार वर्षाचा कर्यकाळात आम्ही ईमान ईतबाराने,प्रामाणिक पणे आम्ही जनतेला दिलेल्या 23 आश्वासन पैकी आजरोजी 20 पुर्ण केले.या सबंधी मी लेखाजोगा एखाद्या सभेत देईल.पण एवढे जनमत असताना विरोधक शहरातील काही प्रसिद्ध व्यापारी सुद्धा सतत खटपट करीत असे की कुडमूलवार काम करू नये.यात न.प.कार्यालयातील दोन अध्यक्षपद भोगलेले असून एक दोन उपाध्यक्ष,दोन तीन नगरसेवकांचा समावेश होता.त्यांना सर्व अनुभव असून सुद्धा त्यांना हे माहिती नाही की कुठल्या कारणाने अध्यक्षाना पदावरून अपात्र करावे.फक्त त्यांना एकच माहिती होते की डाॅ.कुडमूलवार शहरात विकास कामे करूनये.पण कुडमूलवार हे 40 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला मानुस आहे.आमच्या विरोधात विरोधक 1 नाही 2 नाही 10 केसेस केले तरी मी केसवाईज जानारा मानुस आहे.पण त्यांच्या या केसेस मुळे चार वर्षात शहर विकास कामात काहीच परिणाम झाला नाही.त्यांचे मुळउद्देश सफल झाले नाही.त्यांनी उपस्थिताना म्हणाले तुम्हाला असे वाटत असेल की विरोधक केसेस केले नसते तर आम्ही जास्त विकासकामे केले असते पण तसे नाही.त्यांनी केसेस केल्यामुळे मी जास्त कामे करू शकलो.विरोधक असल्या शिवाय प्रेरणा येत नाही.यावेळी पत्रकारांचा माध्यमातून विरोधकांना मला आवहान करायचे आहे. त्यांनी तसेच प्रयत्न करावे.कारण उपाध्यक्ष पदभार स्वीकारल्या पासून साहा महिन्यात रिक्त असलेले नगराध्यक्ष निवडायचे आहे.मला असे पण त्यांना आवाहान करायचे आहे.त्यांनी आठ दिवसात निवडणूका लावावे.आमची तैयारी आहे.कारण आमच्याकडे बहूमत आहे त्यासह नगराध्यक्ष पद ओ.बी.सी महिलासाठी राखीव आहे.आमच्याकडे ओ.बी.सी. 3 महिला भगीनी आहे.त्यांच्याकडे निवडणूकीसाठी उम्मेदवारच नाही.त्यांना हे सर्व माहिती असताना हे कारस्थान कशासाठी केले हे कळत नाही.ते गावाचे शत्रू आहे की हितचिंतक काय समजावे ? मी यापूर्वी सुद्धा जनता जनार्धनास आश्वासन दिलो की पाच वर्षचा कार्यकाळ पुर्ण करणार शहराचा विकास साधणार,असेपण या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार म्हणाले. यावेळी उपस्थित नगरसेवकांचा वतीने नगराध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांचा यथोचित सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आले. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव उपस्थित होते.