सोनपेठ येथे संत भैय्युजी महाराज पुण्यतिथी निमित्त राष्ट्र चेतना महायज्ञाचे आयोजन ; रक्तदान,वृक्षारोपण व आरोग्य तपासणी होणार .

सोनपेठ : राष्ट्र संत श्री भैय्युजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोनपेठ येथे दि १२ पासुन राष्ट्र चेतना महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबिर,वृक्षारोपण, आरोग्य तपासणी या सह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुर्योदय परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
राष्ट्र संत प.पू.भैय्युजी महाराज यांच्या व्दितीय पुण्यस्मरणार्थ सोनपेठ येथील सुर्योदय परिवाराच्या वतीने भैय्युजी महाराजांच्या प्रेरणेने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे .दि १२ जुन पासुन सुरु होणाऱ्या या राष्ट्र चेतना महायज्ञात कोवीड १९ मुळे निर्माण झालेला रक्ताचा तुडवडा भरुन काढण्यासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय व सक्षम यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कृष्णा पिंगळे व वृक्षमित्र महेश जाधव यांच्या सहकार्याने सोनपेठ व जुन्या वाणीसंगम भागात एक हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे.तसेच कोरोनाशी लढणाऱ्या कोरोना योध्द्या सह नागरीकांना औषधांचे वाटप करण्यात येणार आहे .या बरोबर ईतर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सुर्योदय परिवाराचे सुधीर बिंदू यांनी दिली आहे. दि.१२ रोजी सकाळी ११ वाजताभैय्युजी महाराज यांना देशमुख कॉम्प्लेक्स येथे सुरक्षित शारीरिक अंतर राखुन आदरांजली वाहुन या महायज्ञाची सुरुवात करण्यात येणार आहे.या महायज्ञात सहभागी होऊन नागरिकांनी राष्ट्र उभारणीत हातभार लावावा असे आवाहन सुर्योदय परिवाराचे रवींद्र देशमुख सक्षमचे डॉ भगवान देशमुख राकेश मेहता अमोल पांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *