सोनपेठमध्ये साध्या पध्दतीने घरीच ईद साजरी करण्यात आली.
सोनपेठ/मंजूर मूल्ला : जगात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुकामधील सर्व मुस्लिम बांधवांनी पहिल्यांदाच साध्या पध्दतीने रमजान ईद साजरी केली. ईस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्याला एक आगळेवेगळे महत्त्व आणि स्थान असते त्यामुळे जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात या महिन्यात तिस दिवस रोजे केले जाते दररोज पाच वेळ नियमितपणे अदा केली जाणाऱ्या नमाज व्यतिरिक्त तरावीहची नमाज देखील अदा केली जाते रमजान महिना सुरू होताच ग्रामीण भागासह शहरच्या ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी असते.मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने जमावबंदी कायदा लागू केल्यामुळे तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी पाच वेळची नमाज,तरावीहची नमाज रोजा ईफ्तार व ईद-उल-फित्रची नमाज हि ईदगाह मैदानात न करता घरातच अदा केली व सोशल डिस्टन्सींगचे पालन करत गळाभेटी न घेता लांबूनच एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.