सेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार
तालुक्यातील पुरी या गावाचे पोलीस पाटील म्हणुन गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून अविरत सेवा देणारे पुरी गावाचा कणा समजल्या जाणा-या या पदाची गरीमा लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांनी अतिशय निष्ठेने सांभाळली. नागरिक व पोलीस प्रशासनातील महत्त्वपूर्ण दुवा असणारे हे पद सांभाळताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. काही क्लिष्ट घटनांचा छडा लावताना पोलिसांच्या खांदयाला खांदा लावून त्यांनी आपले कर्तव्य बजावणारे लक्ष्मण पंढरीनाथ मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांची काल शनिवार (दि.१२) रोजी सेवानिवृत्त झाली. त्याबद्दल गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.