*सेवाधर्म: ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीतील कोरोना योद्ध्यांना आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलीसीचे वितरण* *बुद्ध पौर्णिमेनिमित्त निर्मित करण्यात आलेल्या पुस्तकाचेही ना. मुंडेंच्या हस्ते विमोचन*
परळी (दि. 07) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात सुरू असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपले प्राण पणाला लावून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आरोग्य विमा व जीवन विमा योजनेचा लाभ देण्यात आला असून, या विमा पॉलिसीचे वितरण ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी येथील महानिर्मिती विश्रामगृह (चेमरी रेस्ट हाऊस) येथे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त निर्मिलेल्या वंदना सुत्रपठन या विशेष पुस्तकाचे विमोचनही आज ना. मुंडेंच्या हस्ते करण्यात आले आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सेवाधर्म हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, प्रभावी झालेल्या, रुग्ण, नातेवाईक, कुटुंब यांना विविध मार्गांनी मदत व दिलासा देण्याचे काम अविरत सुरू आहे. सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या काळात आधार मिळावा यासाठी रुग्णालयात काम करणारे नर्सिंग स्टाफ, स्वयंसेवक, रुग्ण वाहिका चालक, स्मशान भूमीमध्ये अंत्यविधी करणारे सेवक अशा एकूण 25 जणांना नामांकित कंपनीचा 5 लाख रुपयांचा कॅशलेस आरोग्य विमा व 2 लाख रुपयांचा जीवन विमा पॉलिसीचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्धांच्या त्रिसरण, पंचशील, संविधान उद्देशिका आदी महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख असलेल्या वंदना सुत्रपठण या विशेष पुस्तिकेचे ना. मुंडेंच्या हस्ते विमोचन करण्यात आले असून, या पुस्तिकेच्या 5000 प्रति वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे. या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे यांच्या सह, जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, अनंत इंगळे, रवी मुळे, प्रणव परळीकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार रुपनर, रविंद्र परदेशी, माधवराव ताटे, कीशोर पारधे, नितीन रोडे, दत्ताभाऊ सावन्त, जालिंदर नाईकवाडे, महेंद्र रोडे, पंडित झिंजुर्डे, प्रा.शाम दासूद, लालाभाई पठाण, शिवसेना नेते रमेश चौंडे, अमोल कानडे, प्रा.शाम दासूद सर, केशव गायकवाड, सुभाष वाघमारे, धम्मा अवचारे, शरद कावरे, वैजनाथ जोशी, भारत ताटे, भीमा डावरे, अमर रोडे यांसह आदी उपस्थित होते.