सुशांतच्या कुटुंबीयांचा जबाब पुन्हा नोंदवणार?

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत Sushant Singh Rajput याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस Mumbai Police करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात २७ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. त्यांची चौकशी पुन्हा का केली जाणार आहे याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.सुशांतसिंह राजपूत याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे त्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, त्यांची पुन्हा जबाब नोंदणी कशासंदर्भात केली जाणार आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांतच्या फायनान्सबाबत आणि कंपनीत रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाच्या भूमिकेबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *