Uncategorizedऔरंगाबाद

सुरक्षित अंतर ठेवून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला

 गंगापूर (प्रतिनिधी) – कोरोना प्रादुर्भावच्या  पार्श्वभूमीवर जगाच्या पाठीवर अनेक बदल झालेले दिसत असताना आता  लग्न सोहळे  अतिशय साध्या पद्धतीने होत असल्याने लग्न करणारे कुटुंब हे साध्या पद्धतीने साजरी करून समाजापुढे एक वेगळे आदर्श निर्माण करीत आहेत असाच एक लग्न सोहळा गंगापुर तालुक्यातील घोडेगाव येथे साध्या पद्धतीने पार पडून कौतुकाचा विषय ठरला आहे. गंगापुर तालुक्यातील  घोडेगाव येथील पत्रकार इब्राहिम शेख यांची कन्या आयशा  आणि सिद्धनाथ वाडगाव येथील राजू भाई शेख यांचे चिरंजीव समीर शेख यांचा विवाह चार महिन्यापूर्वी ठरला होता या विवाहासाठी मंगल कार्यालय सर्व निश्चित झाले असताना गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू असल्याने या दोन्ही कुटुंबात समन्वय होऊन लग्न सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले आणि शनिवारी लग्न सोहळा पार पाडण्यात आला या लग्नसोहळ्यात मास्क,  सॅनिटायझर वाटून अगदी रीतसर परवानगी घेत शिस्तबद्ध आणि सुरक्षिततेचे नियम पाळून लग्न सोहळा  पार पडल्याने समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे या विवाह सोहळ्यास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत आली सय्यद, गावातील सरपंच, उपसरपंच,  पोलीस पाटील, तसेच गंगापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.             समाजात इथून पुढे असेच साध्या पद्धतीने विवाह सोहळे साजरी झाले पाहिजे सर्व समाजातील बांधवांनी यापुढे गाजावाजा न करता असेच लग्न सोहळे साजरी करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करावा, मुलीचे वडील इब्राहिम शेख राहणार घोडेगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *