सुधा-रत्न चॅरिटेबल ट्रस्टने केले सामाजिक उपक्रमाचे आयोजन…
दि.12 ऑगस्ट रोजी सुधा-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 5000 मास्क वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.आज पूर्ण जगात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे .यावर अजून तरी लस निर्माण झालेली नाही.या आजारामुळे माणूस माणसापासून दुरावला गेला आहे . जनता भयभीत झालेली आहे .यावर एकमेव उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे व तोंडाला मास्क लावणे हा आहे.या कोरोना काळात सगळ काही बंद असताना ऊन,वारा, पाऊस, कशाची तमा न बाळगता कोरोना योद्धा म्हणून जनतेसाठी अहोरात्र काम करणारे आमचे देवदूत पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा व त्याच्याबद्दल आमच्या मनात असणारी कृतज्ञता ,आमची समाजाबद्दल असलेली सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे .आज पोलीस स्टेशन,गंगाखेड. व उप जिल्हा रुग्णालय,गंगाखेड. रक्तदान शिबिर, गंगाखेड.पूर्णा, पालम, या ठिकाणी सुधा-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.यानंतर सोनपेठ,परळी (वै) आदी ठिकाणी 5000,मास्कचे वाटप केले जाणार आहे.या अगोदर पण सुधा-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परीसरातील वाडी- वस्तीवर जाऊन तेथील शाळेतील गरजू व गरीब मुलांना कपडे, बूट व शालेय साहित्य,लहान मुलांना खाऊ इत्यादीच वाटप करण्यात आलेल आहे.तसेच पर्यावरणाचा समतोल कायम राहावा म्हणून ट्रस्टच्या वतीने परिसरात वृक्षारोपन करण्यात आलेलं आहे. या पुढेही असे नवनवीन सामाजिक उपक्रम राबवण्याचा ट्रस्टचा मानस आहे असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे . सुधा-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई फड/गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिपक फुंदे सर व मा.रत्नाकररावजी गुट्टे (खा) औ.प्र.संस्थेचे प्राचार्य श्री ईश्वर फुंदे सर व संस्थेचे शिक्षक व कर्मचारी यांच्या कडून हा उपक्रम राबवला जात आहे….