सिद्धार्थ सोशल फौंडेशन आयोजित बौद्ध संस्कृती स्पर्धास प्रचंड प्रतिसाद…!

अक्कलकोट: सिद्धार्थ सोशल फाउंडेशन व प्रबुद्ध भारत न्यूज ऑनलाईन बौद्ध संस्कृती आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा दि. 7 मे ते 10 मे पर्यत ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते त्यात राज्यभरातून 4839 स्पर्धक भाग घेतले आहे ज्या स्पर्धकांना 50 च्या पुढे गुण प्राप्त झाले आहेत त्या आज सिद्धार्थ सोशल फौंडेशन संचालक निजप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमिताने सदर स्पर्धचे प्रमाणपत्र ऑनलाईन वाटप चालू करण्यात आले आहे. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीक्षक म्हणून नेहरू युवा केंद्र अक्कलकोट तालुका समन्वयक,प्रा.गौतम बाळशंकर, सिद्धार्थ सोशल फौंडेशन अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, सोशल मीडिया प्रमुख अनिल गायकवाड, संचालक मंडळ बसवराज सोनकांबळे, प्रा.राहुल रुही, निजप्पा गायकवाड, चंद्रशेखर भांगे, सुनील गायकवाड, शांतकुमार बनसोडे आदीने परिश्रम घेतले , सदर स्पर्धेचे महाराष्ट्रभरातुन संस्थेचे कौतुक होत आहे स्पर्धाकांच मनःपूर्वक आभार संस्थापक कमलाकर सोनकांबळे यांनी मानले व संस्थेने या पुढे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे असल्याचे व लवकरचं अक्कलकोट तालुक्यात जिल्हास्तरीय बौद्ध धम्म परिषद घेणार असल्याचे सांगितले

115 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *