सिंधीकाळेगाव येथील सर्व दुकाने बंद;रस्त्यावर शुकशुकाट
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाअधिकारी रविंद्र बिनवडे यांनी 29 मे ते 31 मे पर्यंत संचारबंदीचे आदेश काढले होते. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील सर्व दुकाने बंद करण्यात आले आहे. किराणा दुकानही बंद ठेवण्याचे आदेश असल्यामुळे दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट दिसुन आला.