सामाजिक बांधिलकीतून गावच्या शाळेला बालमित्रांनी दिली आगळी वेगळी भेट!
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर येथील रेणुक शैक्षणिक संकुलात 2003 पर्यत ज्ञानाचे धडे घेऊन आपल्या ज्ञानाची चुणूक ,आपल्या शाळेचा झेंडा अटकेपार घेऊन गेलेल्या दहावी च्या वर्ग मित्रांनी आपल्या गावच्या शाळेला स्मार्ट एल .ई डी .टी.व्ही भेट दिला.
सामाजिक बांधिलकी तून रेणुक विद्यालय ,बर्दापूर येथील दहावी 2003 च्या बॅचमेट नी निश्चय केला व आपल्या उत्पन्नातुन खारीचा वाटा रेणुक शैक्षणिक समुहास दिला. यातून रेणुक प्राथमिक शाळेतील मुलांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट टी.व्ही भेट म्हणून देण्यात आला.
या साठी आज सर्व बालमित्राचा स्नेहमिलन कार्यक्रम अंबाजोगाई येथील साई सुरभी हाॅटेल मध्ये आयोजीत केला होता.या वेळी शाळेला टी .व्ही सुपूर्द केला.प्रसंगी गंगाधर कोकरे सर ,हनुमंत सौदागर, ज्ञानेश्वर सोपने,विष्णू फड,सचिन हरणावळ, बेबी गंडले,स्मिता गवळी तिथे, वैशाली शिंदे,विष्णू सोनवणे,आश्रुबा माने हे सर्व मित्र मैत्रिणी उपस्थित होते.