सहा महिन्यापासून उपकेंद्राला मिळेना कनिष्ठ अभियंता
परभणी/जिल्हा प्रतिनिधी समाधान घोळवे — बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र अंतर्गत बोरीसह परिसरातील ३० ते ४० गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री-अपरात्री निर्माण होणाऱ्या वीज समस्या दूर करण्यासाठी येथील उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता असणे गरजेचे आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून या उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता यांचे पद रिक्त आहे. हे पद तत्काळ भरावे, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेक वेळा परभणी येथील अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी केली. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सद्यस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न वीज ग्राहकांसमोर उभा राहिला आहे. सद्यस्थितीत या उपकेंद्रातील कारभार परभणी येथील कनिष्ठ अभियंत्यांकडून पाहिला जातो आहे. त्यामुळे तत्काळ कनिष्ठ अभियंत्यांची या ठिकाणी नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष