सहाल चाऊस यांना नगरविकास विभागाची नोटीस!!

बीड : माजलगावचे निष्कासित केलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना राज्याच्या नगर विकास विभागाने नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चाऊस यांना करण्याच्या संदर्भाने अहवाल पाठविल्यानंतर या संदर्भात करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून १५ दिवसात खुलासा  करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरुद्ध  नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता . यावर  बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर सुनावणी झाली . यात नगरसेवकांनी ठेवलेल्या आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आहे असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी  दिला आहे. या प्रकरणात चाऊस यांना अपात्र ठरवावे अशी शिफारस देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. चाऊस  यांच्यावर सर्वसाधारण सभा न घेणे , सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त संकेत स्थळावर न देणे , इतिवृत्त मंजूर होण्यापूर्वीच कारवाई करणे असे आक्षेप ठेवण्यात आले आहेत. यावर आता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने चाऊस यांना नोटीस बजावली असून १५ दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. 

124 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *