सरस्वती विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
गंगाखेड (प्रतिनिधी)* शहरातील सरस्वती विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग, मास्क ,सॅनिटायझर या सर्व शासकीय नियमांचे पालन करत हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राम पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . तर कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक लक्ष्मण मादर पल्ले ,पर्यवेक्षक रमेश गिराम, माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, क्रीडा शिक्षिका वंदना बंगाळे, तुकाराम कागणे यांची प्रमुख उपस्थिती होती .तर कार्यक्रमासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्याम बाजपेई, सुरेखा महाजन ,नीतांजना सुगावकर, अरुण पाठक, कंधारकर, जोशी ,घुगे, आलापुरे, काळे , लोंढे, कातकडे, चिलगर, लव्हाळे ,बोरीकर ,मठपती , साळवे, महाजन, करंडे, कोल्हे, कुलकर्णी ,दासरवाड, संगेवार, घोळवे ,वाघमारे, जगतकर, मिसाळ, मुधोळकर, भंडारवाड, राजूरकर, कनकदंडे ,ढमणे,वाळके, खळीकर , ठाकूर ,जंगले आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवकांची उपस्थिती होती. यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्या विना हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.