Newsबीड जिल्हा

समाजबांधवाने घरावर पिवळा झेंडा लावुन २९५ वी पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची घरातच राहुन जयंती साजरी करावी-शिवदास बिडगर

परळी : समजाबांधवांनी घरावर पिवळा झेंडा फडकुन २९५ वी पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उद्या दिनांक ३१ मे रोजी सर्वांनी आप आपल्या घरातच राहुन उत्साहात जयंती साजरी करावी असे आवाहन धनगर समाज मराठवाडयाचे युवा नेते शिवदास बिडगर यांनी केले
देशभरात कोरोना या आजाराने हाहाकार माजला आहे म्हणुन कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर धनगर समाजाचे कुलदैवत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उद्या दिनांक ३१ मे रोजी असुन अहिल्याबाई होळकर यांचे समाजाच्या उन्नतीसाठी मोठे योगदान आहे अहिल्याबाई होळकर यांच्या समाज कार्यामुळे समाजाचा विकास झाला आहे फक्त आपल्या समाजाच्या नसुन सर्वच समाजाचा विकास करण्यामध्ये मोठे योगदान आहे त्यंाचा आदर्श डोळयासमोर ठेवुन त्यांची जयंती समजाबांधवांनी आपआपल्या घरावर पिवळा झेंडा फडकुन घरातच राहुन उत्साहात जयंती साजरी करून इतर समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला पाहिजे तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी धनगर समाजासह सर्व समाज बांधवांनी आपआपल्या घरातच अहिल्याबई होळकर यांची जयंती साजरी करावी असे आवाहन युवा नेते शिवदास बिडगर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *