*समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी दिली कृषी केंद्राला भेट*

सिंदखेड राजा : तालुक्यातील सावखेड तेजन येथे समर्थ कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रात्यक्षिक अंतर्गत सावखेड तेजन येथील कृषी केंद्राला कृषी कन्यांनी भेट दिली त्यावेळी कृषी सेवा संचालकाकडून बुरशीनाशक,कीटकनाशक,तणनाशक,इ.औषधांची व बी बियाणे याबद्दलची सविस्तर महिती जाणून घेतली.त्यावेळी कृषी कन्यांनी तिथे असलेल्या शेतकऱ्यांना किटकाशके फवारणी दरम्यान कशे हाताळावे याची माहिती दिली व कीटकनाशके खरेदी करतांना डब्यावर चार प्रकारची चिन्हे असतात.निळा रंग कमी जहाल,लाल अतिजहाल , पिवळा मध्यम आणि हिरवा कमी विषारी असल्याचे शेतकऱ्यांना कृषी कन्यांनी सांगितले.त्यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे , रावे समन्वयक मोहजीतसिंग राजपूत व प्रा.नारायण बोडखे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यावेळी कृषी संचालक विजय बुधवत व कृषी कन्या कु.शिवकन्या रमेश नागरे ह्या व इतर शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *