सदृढ रोगप्रतिकारक शक्ती साठी व्यापक मोहीम राबविणार : अभिमन्यू खोतकर
जालना ( प्रतिनिधी) : शिवसेना प्रणित युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेना राज्य विस्तार क अभिमन्यू अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ( ता. १३) जालना जिल्हा युवा सेनेच्या वतीने कोरोना संसर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी जालना जिल्हा युवा सेनेच्या वतीने आर्सेनिक अल्बम -३० या होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तथापि सदृढ रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जिल्हाभरात युवा सेनेच्या वतीने व्यापक मोहीम राबविली जाईल. असे युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात सुरक्षित अंतराचे पालन करून आयोजित मोफत औषधी वाटप शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी नगरसेवक बाबुराव पवार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकुर, योगेश रत्नपारखे,सुमित पाटील, अमोल दुसाने, संतोष परळकर, विक्रम कुसूंदल, किशोर ताजी, अमित ठाकुर ,विशाल ढवळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिमन्यू खोतकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील युवकांचे आधारवड असलेल्या ना. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य भरात युवा सैनिक संकटात आपापल्या परीने गरजवंतांना मदतीचा हात देत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता लोकोपयोगी उपक्रम राबवले पाहिजे याच भावनेने हा उपक्रम घेतला असल्याचे अभिमन्यू खोतकर यांनी नमूद केले. आयोजक तथा युवा सेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकुर यांनी नेत्यांच्या सुखद प्रसंगात जनतेला उपयोगी अशा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषधांचे मोफत वितरण करण्याचा उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला. असे सांगितले. या वेळी विशाल ढवळे, शुभम खुळे, अर्जुन पवार, शुभम ठाकुर, योगेश साळुंके, गणेश सोळुंके, ऋषी भोंडे, श्रीधर उघडे, अजय पवार, विकास जोगदंड, अभिजीत ठाकुर, यांच्या सह पदाधिकारी व युवा सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.