Uncategorized

*सतिश चव्हाण हे ‘सच्चे’ उमेदवार, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्याने योगदान – धनंजय मुंडे* *भाजपने निवडणुकीपूर्वीच आत्मविश्वास गमावला – उमेदवारीच्या गोंधळावरून मुंडेंचा विरोधकांना टोला*

उदगीर (दि. २०) —- : ‘सच का साथ, सबका विकास’ हे ब्रीद वाक्य घेऊन महाविकास आघाडीकडून तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले सतीश चव्हाण हे ‘सच्चे उमेदवार असून, पदवीधर, विद्यार्थी यांच्या शैक्षणिक, रोजगार यासह शेती, सिंचन अशा अनेकविध प्रश्नांवरील त्यांच्या आजपर्यंतच्या कामाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित पदवीधर मेळावा व जाहीर सभेत श्री मुंडे बोलत होते. पुढे बोलताना ना. धनंजय मुंडे यांनी भाजपने मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उतरण्यापूर्वीच आत्मविश्वास गमावला आहे, भाजप मधील उमेदवारीचा गोंधळ, अंतर्गत बंडाळी आदी बाबींवरही लक्ष वेधत चांगलीच टोलेबाजी केली. सत्ता नसल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. मराठवाडा पदवीधर निवडणूक ही सुशिक्षित लोकांना सत्तेसाठी हपापलेल्या व महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याची एक संधी असून, या निवडणुकीत भाजप ला असे गाडा की, पुन्हा मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवायचा ‘नाद’ भाजप करणार नाही; असे आवाहन यावेळी ना. मुंडे यांनी उपस्थितांना केले. या जाहीर मेळाव्यास ना. मुंडे यांच्यासह राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, बसवराज पाटील नागराळकर, विजयकुमार पाटील, सिद्धेश्वर पाटील, कल्याण पाटील, शिवाजीराव मुळे, रामराव बिरादार, मिनाक्षी ताई शिंगडे, चंदन पाटील, भरत चामले, समीर शेख, सुनील केंद्रे, मंजूर खान पठाण, नवनाथ गायकवाड , दीपालीताई औटे, उषाताई कांबळे, सुदर्शन मुंडे, अर्जुन आगलावे, विठ्ठल चव्हाण, विनायक जाधव, रामराव राठोड, चंद्रकांत टेंगटोल, डी के मोरे, मामा सोनवणे, प्रवीण भोळे आदींसह उदगीर तालुका व परिसरातील पदवीधर – शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *