सकल मराठा समाजाची रविवारी परळीत महत्वपुर्ण बैठक .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- सकल मराठा समाजाची विभागीय व परळी तालुकास्तरीय महत्वपुर्ण बैठक रविवार दि.4 ऑक्टोंबर रोजी परळीत आयोजित करण्यात आली असुन या बैठकीस सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला नुकतीच स्थगीती दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. बहुतांश मराठा समाजाची आजची आर्थिक परस्थिती अत्यंत नाजुक असुन गुणवंत असुनही आरक्षण मिळाल्याशिवाय हे विद्यार्थी शिक्षण घेवुच शकत नाहीत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजाला जबर धक्का बसला असुन कांही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखा मार्ग पत्कारला. परंतु हा मार्ग नव्हे. आपण पुन्हा सर्वजन एक होवुन लढु व आपला हक्क मिळवुनच घेवु. मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी व मराठा समाजाला ठोस आरक्षणाची तरतुद करण्यात यावी यासाठी रविवार दि.4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता अक्षदा मंगल कार्यालय, शिवाजी चौक, परळी वैजनाथ येथे विभागीय व परळी तालुकास्तरीय महत्वपुर्ण बैठकीस सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *